🌟पुर्णा-अकोला लोहमार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प🌟
✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली : पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील जुनोना रेल्वे स्थानकाजवळ अचानक रुळावर आलेल्या निलगायीला रेल्वेची जोराची धडक बसली ही धडक एवढी जोराची होती की नीलगाय हवेत उडून थेट रेल्वेच्या विद्युत वाहिनीवर अडकली गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ही घटना घडली या प्रकारामुळे पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की काल गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी पूर्णा-अकोला-पूर्णा ही रेल्वे अकोल्याकडे जात होती वसमत तालुक्यातील जुनोना रेल्वे स्थानक परिसरात एक नीलगाय अचानक रुळावर आली. त्यामुळे रेल्वेची निलगाईला जोरदार धडक बसली. हि धडक एवढी जोरात होती की निलगाय हवेत उंच उडून रेल्वेच्या विद्युत तारावर जाऊन अडकली त्यामुळे पूर्णा अकोला या मार्गवर वरील रेल्वेसेवा दोन तास ठप्प झाली होती
घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने विद्युत वाहिनीवर अडकलेल्या नीलगायीस खाली काढले. त्यानंतर पूर्णा येथून निघालेली रेल्वे अकोल्याकडे रवाना झाली. पूर्णा ते अकोला व अकोला ते पूर्णा अशी रेल्वे क्रॉसिंग हिंगोली येथे नियमित होत असते. गुरुवारी ही रेल्वे क्रॉसिंग बोल्डा रेल्वेस्थानकावर झाली. तसेच या मार्गावरील रेल्वेगाड्या दीड ते दोन तास उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
या मार्गावर नेहमी घडतात अपघात पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. लहान-मोठे वन्यप्राणीही रेल्वेला धडकून मृत्युमुखी पडत आहेत.....
0 टिप्पण्या