🌟विस्तारवाढ करण्याचा निर्धार करत सोमवार १७ फेब्रुवारी रोजी विस्तारवाढीचा शुभारंभ विधिवत पुजन करुन संपन्न🌟
पाथरी :- पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने आणि इतर पिकांना नैसर्गिक संकटे आणि मिळणारे दर पहाता या वर्षी शेतकरी ऊस या पिकाकडे वळले आहेत ऊसाची प्रचंड लागवड झाल्याने या गोड ऊसाची कडू कहाणी होऊ नये म्हणून माजलगावचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जीजा यांनी ऊस उत्पादक शेतकरी यांना केंद्रबिंदू माणून मागिल पाच सहा वर्षा पासून शेतकरी कामगारांचे हित जोपासले आहे.पुढिल वर्षी ऊसाची उपलब्धता जास्त असल्या मुळे आता पासूनच काटेकोर नियोजन करत गाळप क्षमतेचा विस्तारवाढ करण्याचा निर्धार करत सोमवार १७ फेब्रुवारी रोजी विस्तारवाढीचा शुभारंभ विधिवत पुजन करुन केला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात स्व अशोकसेठ सामत यांनी २००१ साली अवघ्या अकरा महिण्यात विक्रमी कालावधीत प्रतिदिन एक हजार मेट्रिकटन गाळप क्षमतेचा कारखाना लक्ष्मीनगर लिंबा येथे स्थापन केला.गेली २४ वर्ष सातत्याने या साखर कारखाण्याने ऊस उत्पाकांच्या उसाचे गाळप केले.संकटे अनेक आली मात्र त्यावर मात करत कारखाण्याची चाके सतत फिरत राहिली आहेत.याच दरम्यान उस लागवडीचे क्षेत्र आणि पाण्याची उपलब्धी पहाता सामत परिवाराने पाचशे मे टन प्रतिदिन गाळप क्षमता वाढऊन शेतक-यांना दिलासा दिला अन कार्यक्षेत्रही वाढवले. २०१८ साली हा साखर कारखाना माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख जिजा यांच्या कडे हस्तांतरीत झाल्या नंतर दोन तीन वर्ष आहे त्याच स्थितीत मोठी कसरत करत देशमुख कुटूंबाने हा साखर कारखाना चालवला २०२२-२३ या मोठ्या हंगामात जवळ पास ४२ दिवस कारखाना बिघाडी मुळे बंद राहिला पण अशाही स्थितीत रिस्क घेउन चेअरमन देशमुख यांनी शेतक-यांच्या शेवटच्या ऊसाचे गाळप केले.
या नंतर परत एक हजार मे टन गाळप क्षमता वाढवली बॉयलर सह काही नविन यंत्रसामग्री टाकुन कारखाण्याचे पुनरुजिवन केले. गतवर्षी पासुन प्रतिदिन अडिच हजार मे टन गाळप क्षमता तर केलीच पण गाळपा साठी आलेल्या उसाला एक रमकमी २७ शे. रुपये दर ही दिला.आता पुढिल वर्षी ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून ऊस अतिरिक्त होतो की काय अशी शंका शेतक-यां मधून उपस्थित होत असतानाच चेअरमन माजी आ आर टी देशमुख यांनी या साखर कारखाण्याचा प्रतिदिन दोन हजार मे टन गाळप विस्तारवाढ करण्याचा निर्णय घेत. सोमवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. स्वत: आर टी देशमुख, कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांच्या शुभ हस्ते विधिवत पुजनाने या कामाचा शुभारंभ झाला.त्या मुळे आता या भागातील आणि परिसरातील इतर ठिकाणचा ही ऊस योगेश्वरी शुगर्स गाळप करील असा विश्वास निर्माण झाला आहे. या सोबतच पुढील हंगामा साठी अकरा ऊस तोडणी यंत्र ही खरेदी केले जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक रोहित आर देशमुख यांनी दिली त्यातील पाच याच हंगामात सुरू असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे, जनरल मॅनेजर पी वाय चांदगुडे,डेप्युटी जनरल मॅनेजर राजकुमारसिंह तौर,वर्क्स मॅनेजर श्रीहरी साखरे, चिफ केमिस्ट नवनाथ चौधरी,लेबर ऑफिसर रामराव कदम, परचेस मॅनेजर संदिप भंडारे, सुरक्षा अधिकारी गणेश वाघमारे, कर्मचारी,कामगार यांची यावेळी मोठ्या संखेने उपस्थिती होती....
0 टिप्पण्या