🌟सायबर विभागाने या प्रकरणात कंटेंट क्रिएटर रणवीर अलहाबादीयांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे🌟
मुंबई : महाराष्ट्र सायबर विभाग 'इंडियाज् गॉट लटेंट' या यूट्यूब शोची चौकशी करीत असून या संदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाने अभिनेत्री राखी सावंतला जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसार माध्यमांना दिली आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने कंटेंट क्रिएटर रणवीर अलहाबादिया आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा कॉमेडियन समय रैना होस्ट करत असलेल्या शोमध्ये अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांशी संबंधित आहे. सावंत 'इंडियाज् गॉट लटेंट' या शोच्या त्या भागात पाहुणी म्हणून उपस्थित होती, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अभिनेत्री राखी सावंतला २७फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांसमोर हजर राहून आपला जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे अलाहाबादियाने लैंगिकतेबद्दल कथितरीत्या अपमानास्पद वक्तव्य केले होते......
0 टिप्पण्या