🌟पुर्णा शहर बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड....!


🌟परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक वायवळ यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान🌟 


पुर्णा :- गंगाखेड विधानसभेतील बहुजन समाज पार्टी बैठक पुर्णा या ठिकाणी  दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली.यावेळी विधानसभा अध्यक्ष राजू खंदारे, विधानसभा उपाध्यक्ष अशोक पंडित , विधानसभा कोषाध्यक्ष भीमराव आवटे व गंगाखेड विधानसभा पुर्णा शहर अध्यक्ष पदी सुरेंद्र  नरवाडे यांची निवड बसपा प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या आदेशाने, प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर यांनी बसपा परभणी जिल्हा अध्यक्ष अशोक वायवळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.

यावेळी ,बसपा पदाधिकारी भीमराव जोंधळे,समाधान पोटभरे, धारबाजी गायकवाड, युवराज सूर्यतळे,प्रकाश खरे, अनिल इंगोले व बसपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या