🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद नगरीचे आनंदोत्सवात आयोजन......!



🌟या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वैजनाथ पारटकर यांच्या हस्तें करण्यात आले🌟


पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बंडावार सर व रमेश लठ्ठाड सर यांच्या मार्गदर्शन खाली शाळेतील सर्व सहशिक्षकांच्या वतीने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आनंद नगरीचे आनंदोत्सवात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वैजनाथ पारटकर यांच्या हस्तें करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय शिक्षणा बरोबरच व्यावहारिक ज्ञान देखील मिळावं तसेच उत्कृष्ट शेती पिकवून शेतातून उत्पन्न कसे काढावे व आपण स्वतः पिकविलेल्या मालाची विक्री स्वतः कशी करावी या सर्व गोष्टीचे ज्ञान मिळावं म्हणून शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पालक वर्गासह गावातील गावकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी आनंद नगरीत कान्हेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परसबागेतील माळव देखील विक्रीसाठी ठेवण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी परसबागेची गुणवत्ता वाढविण्यासाठी खूप परिश्रम घेऊन आपल्या परसबागेला संपूर्ण परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून देत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

यावेळी कान्हेगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाची स्तुती करतांना गावातील जेष्ठ नागरिक सोपानकाका बोकारे म्हणाले की गावकरी मंडळी शाळेसह शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू यावेळी राम मोरे यांनी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक बोईनवाड सर यांनी आनंद नगरीत कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसह गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या