🌟सेलू तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न......!

🌟कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून ॲड.गणेशराव दुधगावकर यांची उपस्थिती🌟 


सेलू :- सेलू तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण उत्साहात पार पडले याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा माजी खासदार ॲड.गणेशराव नागोराव दुधगावकर यांची उपस्थिती होती यावेळी ॲड.गणेशराव नागोराव दुधगावकर यांच्या हस्तें दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.तलवारे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजेश सोळंके (उपसरपंच ) राहुलदेव सोळंके,प्रसादराव सोळंके, ज्ञानेश्वर राऊत (सरपंच भांगापुर) सोपानराव हारके, माणिकराव सोळंके, महेंद्र दुधवडे,बबनराव शिरसाट, बाबर सिद्दिकी, रामेश्वर राऊत, कुलकर्णी, शंकरराव सोळंके, इत्यादी उपस्थित होते, त्याचबरोबर पंचक्रोशी मधील सर्व सन्माननीय पालक यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली,विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.


कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक ॲड.गणेशराव दुधगावकर यांनी  मुलांना मार्गदर्शन केले , मुलांनी मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी ही भाषेचे ज्ञान त्यांनी मिळवले पाहिजे जीवनामध्ये कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते जे आपल्या हाती काम येईल ते आपण पूर्ण केले पाहिजे अशा प्रकारे  मार्गदर्शन केले, त्यानंतर विद्यालयातील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला यामध्ये देशभक्तीपर गीत, हिंदी,मराठी चित्रपट मधील गाण्यावर डान्स केले , अनेक विद्यार्थ्यांनी नाटकेही सादरीकरण केले, 12 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2025 मुखवटे या नाटकातील सहभागी विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरव केला, तसेच समीर हरकळ ( शाळारत्न) अंजली डोंबे (खेळरत्न माध्यमिक) राधिका जावळे (खेळरत्न प्राथमिक)सुप्रिया भांड(आदर्श विद्यार्थी) शिवानी सोळंके ( शाळा गुणगौरव) विश्वदीप खंदारे (शाळा गुणगौरव)सन्मानचिन्ह रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन  मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला, 43 वे महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड मध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी के चरचरे, एस जी शेख, एस पी इंगळे, पी एस काठोळे, एस टी पाडळसे, डि के कपाटे, पी एस अंभुरे,जी ई गोरे, आर  एम राऊत, व्ही बी पवार,आर बी घुगे, जे पी शिंदे, जी ए शिंदे, एम जी कापरे, एस ए भोसले, ए यु चट्टे, एस आर गायकवाड शिक्षकेतर आर एस पिंपळे (लिपिक) जी बी गिरी, एस सी उपलवाड, एस आर घोडके, एल बी राऊत,  इत्यादी सूत्रसंचालन- पी एस काठोळे व जी ई गोरे यांनी केले तर आभार आर एम राऊत यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या