🌟जेव्हा 83 वर्षीय विजय जाधव शरीर साथ देत नसतांनाही,लाँग मार्च मधील आंबेडकरी अनुयायांच्या भक्कमपणे पाठीशी....!


🌟समाजाने देखील लाँग मार्च मधील आंबेडकरी अनुयायांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले🌟

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे ह्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे ह्या न्याय मागणीसाठी परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च निघाल्याचे   एव्हाना सर्व आंबेडकरी समाजातील लोकांना  ठाऊक झाले आहे

 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई येथे माता रमाई ह्यांच्या जयंती निमित्त केंद्राच्या महिला विकास विभागाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी असे सांगितले की, केंद्राच्या वतीने लाँग मार्च मधील नेतृत्वाकडे सदरचा निधी रूपये 50,000/-  सुपूर्द केले असून,  त्यांना अध्याप भक्कम मानसिक आणि आर्थिक  पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्याच वेळेस त्यांनी थेट लाँग मार्च मध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांशी संवाद साधला.व सर्व उपस्थितांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यांच्या अशा प्रकारच्या तात्काळ प्रतिक्रियेमुळे आमच्यासारख्या लोकांना ऊर्जा मिळते हे निश्चित. 

         मी काल अशा प्रकारे मानसिक व आर्थिक पाठींबा देण्याचे आवाहन केले होते. त्याला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळून काही रक्कम जमा झाली आहे. काही लोकांनी आर्थिक निधी देण्याचे कबूल केले आहे.परंतु काल लाँग मार्च नाशिक मुक्कामी असतांना सरकारने मान्य केल्याचे समजते. त्यामुळे लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. म्हणुन जमा झालेला निधी परत करण्यासंदर्भात मी फोन केला असता, त्यांनी जमा झालेला आणि पुढे जमा होणारा निधी सूर्यवंशी आणि वाकोडे परिवाराला देण्याची सूचना केली आहे. तेव्हा ज्यांना यापुढे निधी जमा करायचा असेल, त्यांनी डॉ. सुप्रिया ह्यांच्या फोन पे वर करावा......

जय भिम 

अरुण निकम, 

9323249487.

दिनांक...09/02/2025.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या