🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळाव्यात केवळ स्नान अन् गंगा पूजनच करणार🌟
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी 5 फेब्रुवारी महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला येत आहेत त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये काही बदल करण्यात आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये केवळ एकच तास थांबतील. या काळात ते केवळ संगमात स्नान करतील आणि गंगेची पूजा करतील. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या टीमने सोमवारी तालीमही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मंगळवारी प्रयागराजला येत आहेत. ते भूतानच्या राजासोबत संगम स्नानासाठी येत आहे यावळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा घेतील, असे मानले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाली 10 वाजता प्रयागराज येथे पोहोचतील. बमरौली विमानतळावरून ते डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील आणि तेथून ते निषादराज क्रूझने व्हीआयपी जेट्टीवर पोहोचतील. ते सुमारे एक तास प्रयागराज येथे राहतील. या काळात ते स्नान आणि गंगापूजन करून परततील. कुंभमेळ्यातील अधिकाऱ्यांच्या म्हण्यानुसार, नव्या प्रस्तावित कार्यक्रमात पर्वीचे इतर कार्यक्रम नाहीत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी पुन्हा प्रयागराज येथे येतील.
यापूर्वीच्या कार्यक्रमात सांगण्यात आले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला येथे पोहोचल्यानंतर अरेल डीपीएस हेलिपॅडवर जातील. तेथून निषादराज क्रूझने गंगा स्नानासाठी जातील आणि नंतर गंगा पूजन करतील. यानंतर, ते सेक्टर सहामध्ये उभारण्यात आलेल्या राज्य मंडपाला आणि नंतर नेत्र कुंभाला भेट देतील. ते महाकुंभा मेळ्या दरम्यान झालेले कामांचीही पाहणी करतील. पंतप्रधानांच्या अक्षयवट आणि हनुमान मंदिरांतील पूजेसंदर्भातही यात सांगण्यात आले होते.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या