🌟जिल्ह्यातील नागरिकांनी मोबाईलचा वापर सतर्कतेने करावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन🌟
परभणी : आज मोबाईलचा वापर हा जासूसा सारखा होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून सायबर गुन्ह्यांविषयी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरक्षित इंटरनेट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ढेसशींहशी षेी र इशीींंशी खपींशीपशीं या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे व उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विकास आडे होते. सायबर सेलचे अधिकारी गणेश कौटकर यांनी सायबर गुन्हे आणि त्यावर होणार्या कारवाईंची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांसाठी टोल-फ्री क्रमांक 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांनी सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार, फीशिंग, व्हीशिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारे संभाव्य धोके यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेबाबत प्र’यनमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्प निदेशक आकाश शिरोरे आणि प्राजक्ता जगताप यांनी केले. सतिष भातलवंडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदानंद जोशी, अमोल पाठक, सावनकुमार कुपटेकर, पवनकुमार संबरकर, संतोष नालंदे, विठ्ठल गिरी, शिवप्रसाद साखळकर, विकास शिंदे, मनोज सोनवणे आणि अजिंक्य माने यांनी परीश्रम घेतले.
इंटरनेट जागरूकता साहित्य https://staysafeonline.in/safer-internet-day येथे उपलब्ध आहे आणि संस्था नोंदणी https://faas.isea.app/formview/sid_registrations येथे करावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. पोटेकर यांनी केले.......
0 टिप्पण्या