🌟अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे🌟
परळी :- बिड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची नक्कल मिळण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना इसवी सन १९७२ बीड जिल्हाधिकारी आदेश क्रमांक 72 एल एन डी पब्लिक १६३३/बीड दिनांक 18./9/72 रोजी 40 भूमिहीनांना जमीन दिली होती त्यातील 26 हे कायमस्वरूपी राहिले असून त्यांची फेरफारला नोंद नोंद असून ती सातबारावर घेण्यात यावी यासाठी संबंधित आदेशाची नक्कल माननीय तहसीलदार तहसील कार्यालय परळी वैजनाथ यांनी मागितले असता आम्ही आज तागायत दिनांक चार-आठ 2022 पासून ते आज पर्यंत अनेक वेळा लेखी निवेदन समक्ष भेटून व उपोषणाच्या नोटीसी देऊनही कुठल्याच प्रकारे न मिळाल्यामुळे आम्ही दिनांक 28 2 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापुढे आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली असून तसे लेखी पत्र ही माननीय जिल्हाधिकारी बीड यांना दिनांक 28 1 2025 रोजी देण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या