🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे 23 फेब्रुवारीला भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन.....!


🌟चिखली येथील ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या वतीने भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन🌟

✍️ मोहन चौकेकर                                                                

 चिखली :- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली (रजि. क्र - 534 / F - 11058) द्वारा संचालित ऋणानुबंध विवाह मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. 23 फेब्रुवारी  2025 रोजी दुपारी 12:00 ते  04:00 वाजेपर्यंत चिखली येथील शिदोरी सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, जयस्तंभ चौक, चिखली जिल्हा बुलडाणा येथे भव्यदिव्य बौध्द वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात डाॅक्टर, ईंजिनीअर, Out Of India सर्व सेक्टर मधली उच्च शिक्षित, सरकारी, निमसरकारी, प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधूर, अपंग, 10 वी 11 वी 12 वी बौद्ध समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे एकच ठिकाणी भेटतील भव्यदिव्य बौद्ध वधु-वर मेळाव्यात या येथे आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यास येतांना विवाह इच्छुक वधू वर व त्यांचे आई वडील किंवा इतर जवळचे नातेवाईक सोबत असणे आवश्यक आहे. तसेच बायोडाटा व फोटो सोबत आणावे मेळावा चे वैशिष्ट्ये तीन सत्र मध्ये असणार मेळावा प्रथम सत्र 12:00 वाजल्या पासून मुला-मुलींची फाईल पाहायला मिळणार दुसरं सत्र 12:30  वाजल्या पासून प्रत्यक्ष कँन्डीडेटसह फँमिली परिचय देणार दुपारी 02:30 वाजता चहा करता ब्रेक असणार तिसरं सत्र संपूर्ण कुटुंबासह प्रत्यक्ष भेटी. एकमेकांशी ओळख करुन देण्याची ऋणानुबंध जुळवण्यासाठी प्रत्यक्ष मदत. करेल प्रत्यक्ष लग्नायोग्य मुलामुलींच्या उपस्थितीत. नियोजित भेटी 12:00 ते 04:30 या दरम्यान होतील.एकाच ठिकाणी एकाच दिवसात जास्तीत जास्त स्थळांचा परिचय आणि प्रत्यक्ष भेटण्याची व्यवस्था.मेळाव्यात आपण हि या आणि आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांना हि कळवा मेळाव्याच्या दिवशीं तुमचा फार्म 12:00 वजल्यापासून हॉल मध्येच भरला जाईल सर्वांच्या प्रोफाइल नंबर प्रमाणें सांगितल्या जातील मेळाव्यात येताना सोबत 1 फोटो घेऊन यायचा आहे. घरात बसून सोयरिक भेटत नाहीत.अपेक्षे प्रमाणे सोयरीक फक्त ऋणानुबंध बौद्ध वधू वर परिचय मेळाव्या मध्येच भेटतात अधिक माहिती करता संपर्क साधावा प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी  8855850378    9689331853 या नंबरवर असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या