🌟केंद्रीय अर्थसंकल्प 2025/26 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा...!


🪷केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त,काय महाग जाणुन घेऊया🪷 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडला. निर्मला सीतारामन  यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. केंद्र सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्प मांडताना गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असं नमूद केलं. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील काही घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली. केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी.

🪷2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त ?

- LED-LCD च्या किंमती कमी होणार

- टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार 

- मोबाईल स्वस्त होणार

- मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट 

- कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री

- लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर 

- भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार

- चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार 

- गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी करणार

2025-26 च्या अर्थसंकल्पात महाग काय?

- इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ

- फॅबरिक (Knitted Fabrics)

- बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.

📝केंद्र सरकारची मोठी घोषणा ; कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स ?

0 ते 4 - Nil

4 ते 8- 5 टक्के

8 ते 12 लाख - 10 टक्के

12 ते 16 लाख - 15 टक्के

16 ते 20 लाख - 20 टक्के

20 ते 24 लाख - 25 टक्के

24 लाखापुढे - 30 टक्के

🪷2024-25 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं होतं ?

सोनं, चांदी

सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर

मोबाईल हँडसेट

मोबाईल चार्जरच्या किंमती 

मोबाईलचे सुटे भाग

कॅन्सरवरची औषधे

🪷पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत

लिथियम बॅटरी 

इलेक्ट्रीक वाहने

सोलार सेट 

🪷चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू

विजेची तार

🪷2024-25 च्या अर्थसंकल्पात काय महाग झालं होतं ?

प्लास्टीक उद्योगांवर कर

प्लास्टीक उत्पादने

सिगारेट

विमान प्रवास

पीव्हीसी फ्लेक्स शीट

मोठ्या छत्र्या

🪷2025-26 च्या अर्थसंकल्पामधील मोठे निर्णय :-

- डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर

- कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार

- किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली

- बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा

- लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार 

📝अर्थसंकल्पात क्षेत्रनिहाय खर्च

■ संरक्षण क्षेत्र

४,९१,७३२ कोटी

■ ग्रामीण विकास

२,६६,८१७ कोटी

*गृह खाते

२,३३,२११ कोटी

शेती आणि शेती संबंधित

१,७१,४३७ कोटी

*शिक्षण

१,२८,६५० कोटी

*आरोग्य

९८,३११ कोटी

*शहर विकास

९६,७७७ कोटी

*आयटी, दूरसंचार

९५,२९८ कोटी

*ऊर्जा क्षेत्र

८१,१७४ कोटी

*वाणिज्य व उद्योग

६५,५५३ कोटी

*समाजकल्याण विभाग

६०,०५२ कोटी

*विज्ञान विभाग

५५,६७९ कोटी

💥अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये :-

| अंदाजे ५० लाख कोटी रुपयांचे एकूण बजेट.

| नोकरदारांचे ₹ १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त.

। ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ₹ ५० हजारांवरून ₹ १ लाख.

■ भाड्याच्या उत्पन्नावरील टीडीएस सूट २.४ लाखांवरून ६ लाख रुपये.

अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला मुभा.

। विमा क्षेत्रासाठी एफडीआय मर्यादेत ७४% वरून १००% पर्यंत वाढ.

। ३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त.

। किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये.

। पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा.

■ स्टार्टअपसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी.

■ ५०० कोटी रुपये खर्चुन तीन 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्कृष्टता केंद्रे बांधणार.

। येत्या ५ वर्षात वैद्यकीय शिक्षणात ७५ हजार जागा वाढवणार.

। देशातील २३ आयआयटीमध्ये ६,५०० जागा वाढवणार.

। एमएसएमईसाठी कर्ज हमी मर्यादा ५ कोटींवरून १० कोटी रुपये.

समाजकल्याण अधिभार काढण्याचा प्रस्ताव.

। सात टॅरिफ दर काढले जातील, आता देशात फक्त ८ टैरिफ दर राहतील.

। दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज.


✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या