🌟परभणी ग्रंथोत्सवाचे 17 फेब्रुवारी पासून आयोजन.....!


🌟यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरूड यांची प्रमुख उपस्थिती राहणार🌟


परभणी (दि.१३ फेब्रुवारी २०२५) :- परभणी ग्रंथोत्सवाचे दि.17 व 18 फेब्रुवारी  2025 रोजी परभणी येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाच्या बाजुस कल्याण नगर, वसमत रोड, परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी  सकाळी 9.00 वाजता हुतात्मा स्मारक, राजगोपालचारी उद्यान ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय या मार्गावर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात येणार आहे यावेळी शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरूड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  

सकाळी 11.00 वा. सुप्रसिध्द जेष्ठ कवी केशव वसेकर यांच्या हस्ते  ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, डॉ. राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्ष म्हणून सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे  हे उपस्थित राहणार आहेत दुपारी 2.30 वा. परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. "भारतीय संविधान – माझा अभिमान" हा विषय आहे. परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून निलकंठ पाचंगे (जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी) हे असणार आहेत.  यामध्ये प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी (नुतन महाविद्यालय, सेलू) व प्राचार्य डॉ. पंजाबराव चव्हाण (दिगंबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर) हे सहभागी होणार आहेत. यावेळी उत्कृष्ट वाचकांना गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी 4.00 वा. कथा कथन होणार आहे. ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र पार पडणार आहे. यात  सरोज देशपांडे, अर्चना डावरे, मिलिंद जाधव व बबन आव्हाड यांचा सहभाग राहणार आहे. दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वा. "अभिजात मराठी भाषा ज्ञान भाषा कशी बनेल?" या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी  प्रा. रविशंकर झिंगरे (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी) हे उपस्थित राहणार आहेत.  किर्तीकुमार मोरे,  शरद ठाकर आणि प्रा. डॉ. सुरेश कदम हे परिसंवादात सहभाग घेणार आहेत.

दुपारी 2.30 वा. कवी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी  रेणू पाचपोर हे राहणार आहेत.  दुपारी 4.00 वाजता समारोप सोहळा होणार आहे. अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार आणि प्राचार्य राहुल नितनवरे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचा साहित्य, रसिक, विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बा.शं. देवणे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या