🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकीच्या 10 विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीत निवड....!


🌟सदर विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांनी केला🌟


✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा/चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील स्थानीक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि.03 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथील नामांकीत कंपनी किरण अकॅडमी  मध्ये संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनीक्स आणि दूरसंसाचार अभियांत्रीकी शाखेतील प्लेसमेंट मध्ये 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्या अभियोग्यता चाचणीत 40 विद्यार्थी निवडले गेले. तसेच तांत्रिक आणि गटचर्चामध्ये 40 विद्यार्थी निवडले गेले तसेच तांत्रिक मानवी संसाधन चाचणी अंती 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान शाखेतील निलेष मनोहर जाधव, गणेश राजू ढाकरके, संम्यक गजानन सोनुने, आकाश वसंता गायगोळ, मोहम्मद कैफ, अनिकेत विलास कोल्हे, गायत्री राजू सर्जन, पुणम शैलेश काटकर, रूतुजा प्रकाश वाघ, तुशार सुधाकर गावंडे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर मुलाखती कंपनीचे व्यवस्थापक  नवम तिवस्कर यांनी घेतल्या.सदर विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. यावेळेस सदर विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अरूण नन्हई यांनी केला.

भुतकाळाची पर्वा न करता भविष्याची स्वप्ने पहा, कल्पनांना कशाचे भय नसते, काळाच्या मर्यादा तर बिलकुल नसतात. त्यामुळेच चिखलीच्या अनुराधा नगरस्थित कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी लावलेल्या वटवृक्षरूपी ज्ञाननगरीत अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले अनेक अभियंते जगाच्या कानाकोप-यात पोहचलेले असून अनुराधा महाविद्यालयाची पताका जगभर फडकविण्याचे काम विद्यार्थी करीत आहे. सदर महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विदेशामध्ये नामांकीत कंपन्यानमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच संपुर्ण भारत देशामध्ये हजारो विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यानमध्ये कार्यरत आहेत. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने व अनुराधा परिवारासाठी गौरवाची बाब असल्याचे मत परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण डॉ. नन्हई म्हणाले की, या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाचा महाविद्यालय व्यवस्थापनाला तसेच माझ्यासह प्राध्यापक वर्गाला देखील सार्थ अभिमान आहे. किरण अकॅडमी  ही पुणे येथील एक अग्रेसर कंपनी आहे. दरवर्षीप्रमाणेच अनुराधा अभियांत्रकी महाविद्यालयाने प्लेसमेंट क्षेत्रामध्ये आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. अभियांत्रकीचे शिक्षण पुर्ण होण्याआधीच बहुतांश विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीत निवड होतांना दिसुन येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या महाविद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकत असतात असेही त्यांनी याप्रसंगी सांगीतले.

महाविद्यालयामध्ये दिले जाणारे शिक्षण हे कार्पाेरेट क्षेत्रामध्ये नोकरी मिळविण्यासाठी अतिशय पुरक व उपयोगी असल्याचे असे निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून विशेश नमुद केल्या जात आहे.परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. व्ही.आर.यादव, सचिव  अँड सौ. वृषालीताई बोंद्रे , कोषाध्यक्ष  सिध्देश्वर वानेरे, विश्वस्त  वर्धमानशेठ डहाळे, आत्माराम देशमाने, अतहरोद्दीन काझी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर प्लेसमेंट जॉबचे यशस्वी आयोजन प्रशिक्षण आणि प्लेसमेन्ट अधिकारी डॉ. लोकेश लोणारे, डॉ. भटकर प्रा. प्रदीप इंगळे, प्रा.मोहीत सातव, प्रा.धरमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.                          

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या