🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र....!


🌟सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुरक्षा पुरवण्याची मागणी पवारांची मागणी🌟 

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहीले असून या पत्रात त्यांनी असे लिहीले आहे की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जिविताला देखील गुंडांकडून धोका असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षा पुरवण्यात यावी.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात शरद पवार यांनी असे म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते बिड,परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी शरद पवारांनी केली आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या