🌟सत्कारमूर्ती म्हणून प्रेमनाथ सुर्यवंशी व दिवंगत लोकनेते विजय वाकोड यांचे सुपुत्र अशिष विजय वाकोडे यांची उपस्थिती🌟
पुर्णा (दि.१३ जानेवारी २०२४) :- पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी तथागत मित्र मंडळाच्या वतीने उद्या मंगळवार दि.१४ जानेवारी २०२५ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तथागत मित्र मंडळद्वारा आयोजित या मराठवाडा नामविस्तार दिन सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भन्ते पंयावंश तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं जेष्ठ नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे हे राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पँथर राहूल प्रधान, इंजिनिअर विवेक मवाडे नांदेड तर सत्कारमूर्ती म्हणून दिवंगत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचे बंधू प्रेमनाथ सुर्यवंशी,दिवंगत लोकनेते विजय वाकोडे (बाबा) यांचे सुपुत्र अशिष विजय वाकोडे परभणी यांची आवर्जून उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम,माजी नगराध्यक्ष दिलीप हनूमंते,माजी उपनगराध्यक्ष मो.हाजी साहब कुरेशी,माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे,माजी नगरसेवक संतोष एकलारे,माजी नगरसेवक यादवराव भवरे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नामदेवराव राजभोज,पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,रवि सोनकांबळे,राजकुमार एंगडे,राजु खरात,गौतम मौगले यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून दादाराव पंडित प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अनिल खगर्रखराटे देवराव खंदारे ॲड धम्मा जोंधळे मधूकर गायकवाड ॲड हर्षवर्धन गायकवाड विरेश कसबे विशाल कदम अशोक धबाले महेबूब कुरेशी मुकूंद भोळे दिलीप गायकवाड शामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे एमयु खंदारे नगरसेविका गयाबाई खंदारे बीबी वाघमारे बौद्धाचार्य तुकाराम ढगे त्र्यंबक कांबळे अमृत कऱ्हाळे अतूल गवळी उमेश बाऱ्हाटे आदि उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ११ वा शाहीर प्रकाश जोंधळे यांच्या भिमव बुद्ध गीतांच्या प्रबोधन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष तथा संयोजक उत्तम खंदारे व तथागत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या