🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!‌


🌟शरद पवारांना मोठा धक्का,आमदार सतिश चव्हाण यांनी साथ सोडली; अजितदादांच्या राष्ट्रवादीत आज करणार प्रवेश🌟 

💫 आयशरने मागून धडक दिली ,15 जण बसलेली मॅक्स टॅक्सी / ऑटो 20 फुट हवेत उडून एसटीवर आदळली, सीटापण बाहेर फेकल्या गेल्या , पुणे नाशिक महामार्गावर 9 जण जागीच ठार; पुणे जिल्ह्यात झालेल्या 2 विचित्र अपघातात 12 जण ठार, पहिल्या  नारायणगावजवळील घटनेत 9 ठार तर जेजुरी जवळ झालेल्या अपघातात 3 जण ठार 

💫 पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; पुण्यातील पहिल्याच भेटीत गृहराज्यमंत्री योगश कदम यांची घोषणा ; सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात, नवी मुंबईतील आमदारांचे पदासाठी लॉबिंग सुरु 

 💫सैफ अली खानच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा, हादरवणारा फोटो समोर, नव्या CCTV ने आरोपीचा डेंजर डाव उघड! ; सर्जरीनंतर सैफ अली खानचा पॅरालिसीसचा धोका टळला, आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, डॉक्टर म्हणाले, सैफची  प्रकृती सैफ / स्थिर ! 

 💫कृषी खात्यातील साहित्य खरेदीच्या धोरणात कोणत्या आधारावर बदल केले?, न्यायालयाचा सरकारला सवाल; मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ; आम्हाला नांदेडचा बीड करायचा नाही, धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकांचा इशारा 

 💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होईल 

💫बीड जिल्ह्यातील आष्टी आता दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येनं हादरला; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात 

 💫वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन ; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण, म्हणाले, ते दर्शनासाठी आले आणि निघून गेले ; ज्योती जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुले ; पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स, दुसऱ्या पत्नीच्या नावावर मोठे घबाड 

 💫वाल्मिक कराडचे दोन खास व्यक्ती विदेशात ; सीआयडीकडे नवीन माहिती, आर्थिक व्यवहाराचंही गूढ आता उलघडण्याची शक्यता ; अजितदादांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना वाल्मिक कराडने हार्वेस्टरच्या नावाने घातला गंडा; शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितली आपबिती 

 💫शरद पवारांना मोठा धक्का,आमदार सतिश चव्हाण यांनी साथ सोडली; अजितदादांच्या राष्ट्रवादीत उद्याच प्रवेश करणार ; लग्न करायचं असेल तर ठीकय, पण निवडणुकीतही धर्म अन् जात; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय 

 💫बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत ; युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू 

 💫टीम इंडियाचा धुव्वाधार फलंदाज रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली ; नेमबाज मनु भाकर, डी. गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान 

💫लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका,लाभ नाकारण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक महिलांचे स्वत:हून अर्ज

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या