🌟फरार तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून केले अटक🌟
पुणे - बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अमानुष हत्याकांड प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपी पैकी हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार असलेला सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना बिड जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने पुणे येथून यशस्वी सापळा रचून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणास मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्याकांड प्रकरणातील आरोपी पकडण्यात पोलिसांना मागील पंचवीस दिवस उलटून गेल्यानंतर देखील पदरात अपयशच पडत असल्याने सर्वसामान्य जनतेतून तिव्र असंतोष व्यक्त होत केला जात होता परिणामी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सापडत नसलेल्या आरोपींना फरार घोषित करून माहिती देण्याचे आवाहन जनतेला केले होते याप्रकरणी मसाजोग येथील गावकऱ्यांनी फरार आरोपी तात्काळ करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले असता आरोपींना दहा दिवसात जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन बिड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी दिले होते दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी व मुख्य सुत्रधार असलेला सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्याजवळ ताब्यात घेतले आहे दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी पैकी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.....
0 टिप्पण्या