🌟पहाटेच्या शपथविधीची शिक्षा मला मिळाली - मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. कुणी कितीही निराधार व बिनबुडाचे आरोप करून मला अडकवण्याचा किंवा माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे याचेच जास्त वाईट वाटत आहे असा गंभीर आरोप करत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या सोबत राष्ट्रवादीत जोडलो गेलो तेव्हापासून अजित पवारांच्या दिमतीला प्रत्येक वेळी उभा राहिलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खलनायक ठरवण्याचा डाव हाणून पाडला असे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची आठवण करून दिली.
श्रीक्षेत्र शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नवसंकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की "आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्येच्या आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडून मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र, तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे. अजित पवारांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच आहे."
"बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे. त्याला जात, धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे," असेही त्यांनी सांगितले.
💫पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही भाजपसोबत जाऊ नका हे षडयंत्र आहे :-
💫पहाटेच्या शपथविधीची शिक्षा मला मिळाली - मंत्री धनंजय मुंडे
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झाले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली, पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी आठवणही धनंजय मुंडेंनी सांगितली.
0 टिप्पण्या