🌟परभणी कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस पिकातील पऱ्हाटी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....!


🌟या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास खोबे तर आभार प्रदर्शन प्रगतशिल शेतकरी सौ.शिवनंदा गंगाधर होगे यांनी केले🌟

परभणी :- भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर व परभणी कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडयातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र,गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. 

या प्रकल्पा अंतर्गत दि. 21 जानेवारी 2025 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक विशेष कापूस प्रकल्प अमित तुपे यांनी मौजे.नागर जवळा ता. मानवत जि. परभणी येथे सघन व अतिसघन तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन  केले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नागरजवळयाचे उचसरपंच नारायण बाबासाहेब होगे हे उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नामदेव काळे तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना या प्रकल्पाचा उद्देश महत्व व याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे या बाबत सविस्तर माहिती दिली. 

डॉ.उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस वेचणी पूर्ण झालेल्या कपाशीच्या अवशेषांचा कॉटन श्रेडरच्या मदतीने शेतातच बारीक करून जमिनीचा कर्ब वाढविण्याकरिता उपयोग करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले, व कापूस काढणीनंतर पराटीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अनियंतत्रित पध्दतीने न जाळता पायरोलिसिस या नियंत्रित ज्वलन पध्दतीव्दारे बायोचार तयार होतो. तसेच शेतकऱ्यांना कापूस हे पिक डिसेंबर महिन्याच्या शेवटी पुर्ण वेचणी करुन काढुण टाकावी, कपाशीची फरदड घेणे टाळावे जेणे करुन पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळाता येईल याबाबत मार्गदर्शन केले. 

श्री.कुंडलिक खुपसे, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सघन व अतीसघन कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी पुढील हंगामात सघन लागवड तंत्रज्ञान पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोजे. नागरजवळा, किन्होळा, पोहडुळ या गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास खोबे तर आभार प्रदर्शन प्रगतशिल शेतकरी सौ.शिवनंदा गंगाधर होगे यांनी केले......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या