🌟क्रिडा स्पर्धा उत्साहात संप्पन्न होवून खेळाडूंमध्ये उत्साह वृद्धिंगत झाल्याने नेहरू युवा केंद्राची संकल्प सिध्दी झाली - आशिष पंत
हिंगोली (दि.२३ जानेवारी २०२५) :- भारत सरकारच्या खेल एवं युवा क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात संप्पन्न होवून जिल्ह्यातील खेळाडू मधे उत्साह वृद्धिंगत झाल्याने नेहरू युवा केंद्राची संकल्प सिध्दी झाली त्यामुळे सर्व सहभागी खेळाडू,पंच,क्रीडाप्रेमी,अन् सहभागी मान्यवरांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे उदगार जिल्हा युवा समन्वयक आशिष पंत ह्यांनी काढले.
हिंगोली तालुका क्रीडा संकुलात दि.२२ जानेवारी रोजी सकाळ पासून शुभारंभ झालेल्या स्पर्धांच्या अंती बक्षीस वितरण समारंभात स्वागत पर प्रास्ताविकात ते बोलत होते.ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचा १९९३ ला आदर्श युवा पुरस्कार प्राप्त पत्रकार डॉ.विजय निलावार,तालुका क्रीडा अधिकारी ए.आर. बोथीकर,कबड्डीपटू दत्तराव बांगर,आदी उपस्थित होते.ह्या वर्षी १५ ते २९ वर्ष वयोगटातील सहभागी विजयी खेळाडू आणि संघाना जिल्हास्तरा वरून थेट राज्य स्तरावर खेळण्याचे सौभाग्य प्राप्त असल्याने ह्या सुवर्ण संधीचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूनी घेवून हिंगोली जिल्ह्याच नाव आता राज्यस्तरावर लोकिक करावं असं आवाहन केलं.क्रीडा अधिकारी बोथिकर ह्यांनी आमच्या विभाग कडून जे सहकार्य लागत ते आम्ही नेहमीच देतो त्यामुळे कुणाला काही अडचण आल्यास थेट संपर्क करावा असे आवाहन करून विजेत्यांना पुढील यश साठी शुभेच्छाही दिल्या.
दिवसभर सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या तंत्रिक व नियमांच्या अधीन राहून खेळाडूंनी कस प्रदर्शन करावं ह्याची माहिती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू गजानान आडे ह्यांनी दिली,व मोलाचं मार्गदर्शन केलं. स्पर्धां व बक्षीस वितरण शुभारंभ समारंभ वितरण संचालन नेहरू युवा केंद्राच्या प्रवीण पांडे ह्यांनी केलं.ह्या प्रसंगी जिल्हा कोषागार कार्यालयाचे श्रीमती एस डोंगरे दिवे मॅडम,भावना नरमिरवार क्रीडा शिक्षक,एस यु भुमरे,पी.व्ही राठोड रहीम कुरेशी,महाराष्ट्र पोलीस विभागाचे आर.डी.मुकाडे,एकता स्पोर्ट अकॅडमी चे संचालक व राष्ट्रिय खेलाडू गजानन आडे हे मान्यवर उपस्थित होते. मुला मुलींच्या 100 मी धावणे,गोळा फेक,खो-खो कबड्डी स्पर्धा दिवसभर सुरू होत्या. कुठलाही वाद विवाद होवू न देता पंच म्हणून आर.कुरेशी,दत्तराव बांगर, गजानन आडे,ह्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकता अकादमी, वाटसरु फाउंडेशन हिंगोली ह्यांनी परिश्रम घेतले.तालुका क्रीडा संकुल हे अनेक वर्षा पासून आवश्यक त्या सुविधा व विद्युत लायटिंग नसल्याने खंडहर अवस्थेत असल्याने खेळाडूंची कुंचबना होत आहे ही दुरावस्था अलीकडेच नियुक्त झालेले पालक मंत्री ना.नरहरी झिरवाळ ह्यांनी प्रत्यक्षात भेट देवून सत्य पडताळावे अशी मागणी ह्या प्रसंगी डॉ.विजय निलावार ह्यांनी केली.जिल्हास्तरावरील स्पर्धमध्ये 100 मी धावणे मुलांमध्ये प्रथम क्रमांक चंद्रभान नामदेव घ्यार,. द्वितीय क्रमांक अक्षय विष्णू वानखेडे तृतीय क्रमांक शुभम संजय पाईकराव,मुलीमध्ये प्रथम क्रमांक पायल सुरेश राठोड द्वितीय क्रमांक शुभांगी दिलीप राठोड,तृतीय क्रमांक प्राची दीपक कठाळे,. गोळा फिक्स मुलांच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तेजस राजेश काकडे द्वितीय क्रमांक भगवान शंकर तृतीय क्रमांक अभिषेक रामकिशन शिंदे मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वाती गजानन कोरडे,द्वितीय क्रमांक पायल सुरेश राठोड,तृतीय क्रमांक वैशाली विष्णू चव्हाण सांघिक खेळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकआदर्श स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोली, द्वितीय क्रमांक एकता संघ हिंगोली व तृतीय क्रमांक अंधारवाडी कबड्डी टीम,खो-खो मुलींच्या सांघिक खेळामध्ये प्रथम क्रमांक सर्रोदय विद्यालय खूडज सेनगाव,द्वितीय क्रमांक सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या माध्यमिक विद्यालय हिंगोली,तृतीय क्रमांक सर्जरी क्रीडा मंडळ हिंगोली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या सर्व विजेती खेळाडूंना ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.....
0 टिप्पण्या