🌟बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी ग्रामपातळीवर लघुउद्योग करावा - डॉ.राहुल रामटेके


🌟पुर्णा तालुक्यातील माखनी शिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले🌟


पुर्णा (दि.०९ जानेवारी २०२५) :- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी' या अभियानांतर्गत आज गुरुवार दि.०९ जानेवारी २०२५ रोजी पुर्णा तालुक्यातील माखनी शिवारात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व कृषी मालाचे लघुउद्योगाद्वारे मुल्यवर्धन कसे करता येईल यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

या कार्यक्रमास कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रमोदिनी मोरे, सी एन एच संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक इंजि.गोपाळ राऊत व इंजि.आकाश माने  उस तोड कामगारांची  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माखणी गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पुरस्कार प्राप्त  प्रगतशील शेतकरी  जनार्धन आवरगंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी शेतीतील कच्च्या मालावर गावपातळीवर छोटे उद्योगाद्वारे कृषी मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी मार्गदर्शन केले त्यावेळी त्यांनी कृषी प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या काही यंत्रांविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी शेती क्षेत्रात कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होत असून शेतकरी बांधवांना अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करावा जसे की सोलार पंप, सोलर फवारणी यंत्र, बायोगॅस संयंत्र इ. तंत्रज्ञानाविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ड्रोन द्वारे फवारणी व स्वयंचलित सिंचन प्रणाली या आधुनिक  तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे आवाहन देखील केले.  शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त कामे कशी करता येतील या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे बचत गटांमार्फत महिलांनी विविध प्रक्रिया तंत्रज्ञानाचा तसेच यंत्रांचा वापर करून फळे व भाज्यांचे निर्जंतुकीकरण निरनिराळे मसाले ,शेवया ,आलू चिप्स,धान्य प्रक्रिया केंद्र इत्यादी मूल्यवर्धित पदार्थ तयार करावे व त्याद्वारे लघुउद्योग सुरू करावा. यावेळी बोलताना कार्यक्रमास माखणी  येथील   शेतकरी उपस्थित होते.   सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .ओंकार आवरगंड,मारोती आवरगंड  शिवाजी आवरगंड  मिरा आवरगंड प्रयाग बाई आवरगंड अनुरथ आवरगंड गोविंद पोळ सतीश आवरगंड दीपक आवरगंड परसराम पुरी विष्णू आवरगंड भागवत आवरगंड  यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या