🌟वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी🌟
💫अपात्र ठरण्याची टांगती तलवार, मिळालेले पैसे दंडासहित परत करावे लागण्याची भीती; चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघारी घेतला ; लाभासाठी पात्र नाहीत हे लक्षात आल्यानंतर बहिणी स्वत:हून पुढे येत आहेत, त्या प्रामाणिक आहेत, मंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक
💫दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ; विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावं, अडचण येऊ नये यासाठी प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला,जातीचा उल्लेख नाही; संतापाचा कडेलोट होताच शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचे स्पष्टीकरण
💫मारकडवाडीत ईव्हीएम मशीनचा मुद्दा तापला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार, जंतर मंतरवर करणार आंदोलन
💫 ठाकरे गटानंतर अजितदादा पवारांची राष्ट्रवादीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता, प्रफुल्ल पटेल म्हणाले, शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर वेगळा विचार करावा लागेल ; नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदा माजी मंत्री छगन भुजबळ अन् उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीच्या अधिवेशनात आमने-सामने; धनंजय मुंडे मात्र गैरहजर ; पहिल्यांदाच पंकज भुजबळ दिसताच चर्चा सुरु झाली, पण सुनील तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला पोहोचले
💫 वकील गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा; एसटी कामगार संघटनेचे खळबळजनक आरोप ; ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची शक्यता, व्यावसायिक भागीदाराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
💫 वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी ; वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर ; वाल्मिक कराडचं नाव येताच तपासाचा वेग थंडावतो, मंत्री महोदयांचा वरदहस्त; आमदार संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप
💫BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदाराच्या फॉर्च्युनरला बेस्टची धडक, आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले ; राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, वांद्र्यात आता असुरक्षित वाटतंय; देवेंद्र फडणवीसांनी दखल घ्यावी, झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य
💫आरोपी घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता पण, त्याने घरातून काहीही चोरी केली नाही; अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री करिना कपूरची पोलिसांना माहिती
💫गर्लफ्रेंडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली, बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच ; क्रुरतेचा कळस! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली धिंड, दोरखंडाने बांधलं, चटके दिले, मेळघाटातील घटना ; एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
💫 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्मावर पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी, मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन; तीन वेगवान गोलंदाजांना संधी ; ऑस्ट्रेलियात शतक ठोकलं, तिरुपतीला लोटांगण घातलं, मात्र नितीश कुमार रेड्डीला टीम इंडियात स्थान नाहीच!; शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या