🌟आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती लवकरच होणार सादर....!


🌟आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या नगरीत १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार हे मंदिर अधिवेशन🌟

मुंबई : पहिले पर्व यशस्वी ठरल्यानंतर आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती लवकरच सादर होणार आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या नगरीत १७ ते १९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हे मंदिर अधिवेशन होणार आहे. 

मंदिर अर्थव्यवस्था प्रशासन, कामकाज आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारे हे व्यासपीठ जगभरातील मंदिरांच्या व्यापक व्यवस्थापनासाठी समर्पित आहे. टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आयटीसीएक्सचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड हे या कार्यक्रमाचे सह-नेतृत्व करत आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या