🌟पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आंबेडकरवादी पक्ष संघटनांकडून भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा..!


🌟यावेळी भिमा कोरेगाव येथील प्रतिकात्मक विजयस्तंभासह पाचशे शुरवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले🌟



पुर्णा (दि.०१ जानेवारी २०२४) - पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आज बुधवार दि.०१ जानेवारी रोजी आंबेडकरवादी पक्ष संघटनांकडून करण्यात आला यावेळी भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमिताने भिमा कोरेगाव येथील प्रतिकात्मक विजयस्तंभासह पाचशे शुरवीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, रिपाइंचे जेष्ठ नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुनिल मगरे भारतीय बौद्ध महासभेचे शामराव जोगदंड,दिलीप गायकवाड आदींसह असंख्य पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्या नंतर भिमा कोरेगाव विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशरण पंचशिल बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी अभिवादन गीते व भिमा कोरेगाव इतिहासावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमास मोठ्या संख्येने पुरुष महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचलन बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम एंगडे श्रीकांत हिवाळे अमृत कऱ्हाळे अतूल गवळी मिलिंद कांबळे उमेश बाऱ्हाटे साहेबराव सोनकांबळे यांच्या सह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या