🌟मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळातील इतरांना विस्थापित करून मला मंत्रिपद नको - छगन भुजबळ

 


🌟मी जाणूनबुजून काही काळ राजकारणातून विश्रांती घेतली होती असेही भुजबळ म्हणाले🌟 

देवेंद्र फडणवीस सरकारमधील धनंजय मुंडे यांना काढून भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काल गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की जर इतर कोणाला हटवून मला मंत्रीपद मिळत असेल तर ते मला नको, असे  त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील धनंजय मुंडे यांना काढून भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येईल असा दावा काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.त्यावर भुजबळ यांनी सांगितले की 'मी जाणूनबुजून काही काळ राजकारणातून विश्रांती घेतली होती. मी १९६७ पासून सक्रिय आहे पण कधीकधी राजकीय मनाला विश्रांतीची गरज असते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला मंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते मात्र सात ते आठ दिवस वाट पाहू आणि चर्चा करू असे बोलणे झाले होते. मला कोणाच्या जागी पोस्ट नको. यापुढे आपण सामाजिक कार्यावर भर देणार आहोत.

शुक्रवारी समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमांबाबत ते म्हणाले, प्रतिवर्षीप्रमाणे मी उद्या सकाळी (सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी) नायगावला जाईन. मुख्यमंत्री आणि इतरही तिथे उपस्थित असतील. त्यानंतर चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येईल, जिथे शरद पवार उपस्थित राहतील......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या