🌟भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात धनदांडगा राजकीय पक्ष....!


🌟भाजपकडे रोख व बँक खात्यात मिळून ७,११३.८० कोटी रुपये तर काँग्रेसकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत ८५७.१५ कोटी🌟

नवी दिल्ली : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप पक्षाने काँग्रेस सहित सर्वच पक्षांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडे रोख आणि बँक खात्यात मिळून ७,११३.८० कोटी रुपये आहेत. काँग्रेसकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत ८५७.१५ कोटी असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १,७५४.०६ कोटी रुपये खर्च केले होते. त्या तुलनेत काँग्रेसने २०२३-२४ या कालावधीत लोकसभा निवडणुकीसाठी ६१९.६७ कोटी रुपयांचा खर्च केला होता, असे निवडणूक आयोगाने त्यांच्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केले आहे.दरम्यान, भाजपने इलेक्टोरल बाँडमधून २०२३-२४मध्ये १,६८५.६९ कोटी रुपये जमा केले होते. त्याआधीच्या वर्षी बाँडमधून भाजपची १,२९४.१५ कोटींची कमाई झाली होती. मात्र, आता इलेक्टोरल बाँडवर बंदी घालण्यात आली आहे. अन्य स्रोतांमधून भाजपला २०२३-२४ मध्ये भाजपकडे ७,११३ कोटी रुपये, तर काँग्रेसकडे फक्त ८५७ कोटी निवडणूक आयोगाची माहिती

🌟भारत जोडो यात्रेवर काँग्रेसचा ५० कोटींचा खर्च :-

विरोधी पक्षाने २०२३-२४ कालावधीत एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरवर ६२.६५ कोटी रुपये खर्च केले होते. तसेच आपल्या उमेदवारांना २३८.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले होते. त्याचबरोबर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देशभर निघालेल्या 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या पर्वासाठी ४९.५३ कोटी रुपये खर्च केले होते.२,०४२.७५ कोटी मिळाले होते, तर त्याआधीच्या वर्षात भाजपला ६४८.४२ कोटी रुपये मिळाले होते, असेही निवडणूक आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, काँग्रेसला २०२३-२४ सालात एकूण १,२२५.११ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी १,१२९.६७ कोटी रुपये हे अनुदान, देणग्या आणि योगदानाद्वारे मिळाले होते. काँग्रेसला त्याच सालात इलेक्टोरल बाँडद्वारे ८२८.३६ कोटी रुपये मिळाले होते. भाजपने याच सालात जाहिरातींवर ५९१ कोटी, इलेक्ट्रॉनिक मीडियातील जाहिरातींवर ४३४.८४ कोटी तसेच मुद्रित माध्यमातील जाहिरातींवर ११५.६२ कोटी रुपये खर्च केले होते. त्याचबरोबर विमाने आणि हेलिकॉप्टरवर भाजपने २०२३-२४मध्ये १७४ कोटी रुपये खर्च केला होता. २०२४ मध्ये भाजपने बैठकांवर ८४.३२ कोटी रुपये खर्च केले होते. तसेच आंदोलने, रॅली, मोर्चे आणि कॉलसेंटरवर ७५.१४ कोटी रुपये खर्च केले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या