🌟मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील बहिणींना दिलासा : योजनेतील महिलांकडून पैसे वसुली नाहीच सरकारची घोषणा....!


🌟लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना मोठा दिलासा🌟


मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी बहिणीसाठी दिलासा दायक बातमी हाती आली असून राज्यातील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांचे पैसे घेतले केले जाणार नाहीत अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. लाडक्या बहिणींना आवाहन केल्यानंतर महायुतीला भरघोस मते मिळाली. लाडक्या बहिणींच्या साथीने महायुतीला राज्यात बहुमत मिळालं. राज्यात सत्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या