🌟पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे हंपीपीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य यांचे आगमन....!


🌟यावेळी भारतीय संस्कृतीनुसार श्री जगद्गुरु शंकराचार्य यांचे भव्य स्वागत करण्यात आले🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे आयोजित श्रीसद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव व वैदिक गुरुकुलचा रौप्य महोत्सव या निमित्ताने आज गुरुवार दि.०९ जानेवारी २०२५ रोजी  श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरूपाक्ष,हम्पीपीठ यांचे श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे आगमन झाले यावेळी भारतीय संस्कृतीनुसार त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजी महाराज यांचा १६५ वा जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव दि.०२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत  संपन्न होत आहेत. पूर्वार्धात ऋग्वेद संहिता पद क्रम पाठ षडंगसहित पारायण पूर्ण झाले.उत्तरार्धात भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांची दुपारी ०३.०० ते ०६.०० या वेळेत भागवत कथा,सकाळच्या सत्रात ०९.०० ते १२.०० या वेळेत श्री लक्ष्मी नारायण पंचायतन पंचकुंडी यज्ञ,विविध सहस्रार्चन,दैनंदिन रात्री ०८.०० ते १०.०० या वेळेत किर्तनकारांची नामसंकीर्तन सेवाही दि.०७ ते दि.१३ जानेवारी २०२५ या काळात येथे असा अध्यात्मजागर चालू आहे.

 दरम्यान,या सोहळ्यात आज गुरुवार दि.०९ जानेवारी श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य हंपी विरूपाक्ष,हंपीपीठ (कर्नाटक) यांची श्रद्धेय उपस्थिती लाभली सवाद्य वैदिक मंत्राघोषात विधिवत पारंपरिक पद्धतीने जगद्गुरुचें स्वागत करण्यात आले संस्थानाधिपती वेदमूर्ती उमेशमहाराज टाकळीकर,सौ.अपर्णामाई,वेदमूर्ती अवधूतमहाराज,सौ.अश्विनी,प्रांजली या संयोजक कुटुंबीयांसह सद्गुरू भक्त यांनी पुष्पार्चन केले भागवत कथा श्री जगद्गुरु यांनी श्रवण केली.

विशेष शुक्रवारी दि.१० जानेवारी २०२५ ला सोहळ्यात सकाळच्या सत्रात चंडीयाग विधी पूर्ण झाल्यानंतर संयोजकांच्या वतीने श्रीमद् जगद्गुरू यांची पाद्यपूजा करण्यात येणार आहे यावेळी जगद्गुरु यांचे आशीर्वाचन होणार आहे कुंकुमार्चन व महाआरतीनंतर श्री जगद्गुरु यांच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.नामसंकीर्तनात रात्री ०८.०० वाजता ह.भ.प.सौ.रोहिणी परांजपे,पुणे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे,अशी माहिती वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळीकर यांनी दिली.......

----------------------------------------------------------------------

📿 ऋणानुबंध प्रचीती :-

श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे सद्गुरू दाजी महाराजांच्या काळातही हंपी पीठाचे श्रीमद् जगद्गुरू यांचा चातुर्मास संपन्न झाला होता. हा ऋणानुबंध  या पीठाच्या पुढीलच्या वारसदार जगद्गुरु यांनी कायम ठेवला आहे. आज पुन्हा त्याची प्रचिती आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या