🌟 उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात सिलिंडर फुटल्याने भिषण आग.....!


🌟तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश : संन्यासीची एक लाखाची रोकड जळून खाक🌟

प्रयागराज : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा भयंकर स्फोट झाल्याने भिषण आग आगली. त्यानंतर या आगीत आणखी काही सिलिंडर फुटल्याने १८ निवासी तंबू खाक झाले.तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

प्रयागराज येथे सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ च्या गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. यात १८ तंबू खाक झाले. या आगीत एका संन्यासीची एक लाखाची रोकड जळून खाक झाली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांकडून या घटनेची माहिती घेतली.तंबूंना आग लागलेली असतानाच पुलावरून रेल्वेगाडी जात होती. सुदैवाने आगीच्या ज्वाळा रेल्वेगाडीपर्यंत पोहोचल्या नाहीत. आग लागल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एक जण जखमी झाला.पोलीस महानिरीक्षक वैभव कृष्ण म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवू नका. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या