🌟पुर्णा तालुक्यातील बरबडी,धार,लहान,हिवरा (बु) गावात उद्या हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन....!


🌟या हरिकिर्तन व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बरबडी,धार,लहान,हिवरा (बु) ग्रामस्थांनी केले आहे🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील बरबडी,धार,लहान,हिवरा (बु) गावांत उद्या सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी संत मोतीराम महाराज  व संत मारुती महाराज दस्तापुरकर यांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह व त्या सप्ताह समारोपाच्या काल्याचे हरीकिर्तन हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे सकाळी ०७.०० ते ०९.०० या वेळेत होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असून सकाळी १०.०० वाजता तुळजा भवानी विद्यालय पिंपळा लोखंडे येथे विद्यार्थ्यांशी संवाद होईल नंतर  ११.०० ते १२.०० या वेळेत धार येथे एक दिवसीय मोतीराम महाराज यांच्या नेम,या नेमाचे समारोपाचे हरिकीर्तन होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होईल.

यानंतर दुपारी ०१.०० ते ०२.०० वाजता लहान येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याचे किर्तन होईल,व दुपारी ०२.३० ते ०३.३० या वेळात हिवरा येथे समारोपाचे हरिकीर्तन होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी या हरिकिर्तन व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बरबडी, धार, लहान,  हिवरा (बु)या ग्रामस्थांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या