🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟धुळ्यात आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड  चाळे करणारे तरुण-तरुणी ताब्यात🌟

💫आमदार सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित ; मागण्या मान्य न झाल्यास लवकरच मुंबईची तारीख जाहीर करणार ; उपोषण स्थगित करताना सरकारकडून मनोज जरांगेंना मोठी आश्वासनं; आमदार सुरेश धसांनी सर्वकाही वाचून दाखवलं 

💫 तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय ; खंडणी आणि उद्योगपतींची वाट अडवणाऱ्यांवर मकोका लावेन बीडमध्ये अजित पवारांचा इशारा 

💫बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण,जिल्ह्याची नाहक बदनामी ; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर मनातलं मांडलं ; बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं, म्हणाले जुनं काढू नका 

💫निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता, निवडून आलेल्यांना सुद्धा शंका ; राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार ; केवळ 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी लोकसभेचं गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली 

💫राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि आनंद परांजपेंचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार 

💫विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधात काम करणाऱ्यांवर पक्षाची कारवाई; सुनील शेकळेंविरोधात काम केलेल्या 8 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षासाठी निलंबन 

💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन परतल्यानंतरच नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार; राजकीय खलबतं सुरूच 

💫मग युती कधी ? उद्धव ठाकरे यांच्या समोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर ; ते तर आमचे मित्र; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊतांचा सूर बदलला! 

💫शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या झाल्याचा संशय बळावला; पाचही आरोपी फरार,अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे 

💫 डीपीडीसीतून शिवसेनाला टाळल्याची चर्चा ; आमदार विजय शिवतारेंना समितीत स्थान नाही ; आमदार शेळके,आमदार राहुल कुल यांना संधी, विजय शिवतारे म्हणाले, 'अजित पवार असं करणार नाहीत'

💫पुण्यात मित्राचे कपडे काढून प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स चोळलं, व्हिडिओ काढला अन् सोशल मीडियावर टाकला; हिंजवडीतील घटनेमुळे खळबळ 

💫धुळ्यात आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड  चाळे करणारे तरुण-तरुणी ताब्यात 

💫प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकॉप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच 

💫चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा 

💫 'सैराट' सिनेमातील लंगड्याची फुल्ल हवा,तानाजीचा लूक नवा ; गळ्यात सोनं, हाती घड्याळ,सोबतीला मोनालिसा, नवीन चित्रपटातील जोडी 

💫किंग विराट कोहलीच्या सुरक्षेचे वाजले बारा, दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली; एक चाहता थेट दिल्लीतील मैदानात घुसला अन् पाया पडला ; राहुल देखील ठरला फेल, रणजी ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत केल्या फक्त 26 धावा 

💫पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण

💫बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्री संजय शिरसाट व योगेश कदम यांना अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या