🌟मोबाईल तंत्रज्ञान वाचन संस्कृतीचा अडसर ठरतोय - पत्रकार जगदीश जोगदंड


🌟पुर्णा येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमात ते म्हणाले🌟 

पुर्णा (दि.०४ जानेवारी २०२४) :- आजकाल मोबाईल तंत्रज्ञान अतिरेकी वापरामुळे वाचन संस्कृतीचा अडसर ठरतोय हा अतिरेक भविष्यात असाच वाढत राहिला तर वाचन संस्कृती बंद होण्याची भीती पत्रकार जगदीश जोगदंड यांनी व्यक्त केली ते स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या वाचन कौशल्य कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय आणि   स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार सार्वजनिक वाचनालय , पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या  कार्यशाळेत बोलताना पुढे म्हणाले की माणसाला वाचनाची मोठी भूक असली पाहिजे . वाचनाच्या सवयीमुळे माणसाचे उत्तम व्यक्तिमत्त्व निर्माण होते .  कोणत्याही वयात माणसाला वाचनामुळे आनंदच मिळतो . वाचनाने माणसाचा बुद्ध्यांक वाढून वैचारिक  प्रगल्भता विकसित होते.  वाचनाने माणसाला जी विद्या मिळते ती विद्या हे सर्वश्रेष्ठ धन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचनाचे महत्त्व पटवून देताना वाचनामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो माणूस नैराश्य व ताण तणावातून मुक्त होतो. म्हणून वाचन हे सगळ्यात आनंद देणारा छंद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता पुस्तक वाचनाकडे वळले पाहिजे त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांनी  क्रमिक पुस्तकासोबतच  संदर्भ ग्रंथ ही वाचण्याची सवय या वयात लावून घेतली पाहिजे. असे त्यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षीय समारोपात सांगितले. 

या  कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. डॉ. अशोक कोलंबीकर यांनी मांडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ .विलास काळे यांनी मानले .या कार्यक्रमासाठी सिनेट सदस्य डॉ. विजय भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दत्ता पवार, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल गिरधारी कदम, दिलीप माने, महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील  व सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या