🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील ॲसेम्ब्ली हॉल येथे दि.१३ जानेवारीला धम्मदिक्षा सोहळा🌟
छत्रपती संभाजीनगर :- भारतीय सत्यशोधक महासंघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या पूर्व संध्येला दि. १३.०१.२०२५ रोजी ॲसेम्ब्ली हॉल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी ३.३० वाजता भव्य धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य डॉ. भदन्त उपगुत्प महाथेरो (कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खुसंघ), पु. भन्ते संघपाल (जटवाडा बुध्दविहार, छ. संभाजीनगर), भन्ते बुध्दशील (लातूर) यांच्या हस्ते धम्मदिक्षा संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन सुधाकरजी बौध्द धम्ममित्र सम्यक क्रांती संघटना बेळगाव, कर्नाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्म प्रचारक लक्ष्मीकांत शिंदे अध्यक्ष, भारतीय सत्यशोधक महासंघ प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप कंधारे (नेत्रतज्ञ नांदेड) ॲड. गणेश मेकाणे (अदिलाबाद) प्रा. सुनिल वाकेकर (अध्यक्ष, मानविकास व पुर्ननिर्माण संस्था), गोरक्षनाथ बोलार (अल्यिानगर), प्रुख वक्ते म्हणून लखन चव्हाण (परभणी), आर. पी. गायकवाड (छ. संभाजीनगर), अरूण कांबळे शिंदीकर (छ. संभाजीनगर), धनराज गोंडाणे (छ. संभाजीनगर), भास्कर मामा लिहिणार (नेवासा) ह्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रा. संगिता दोंदे (महिला राज्य अध्यक्ष) संयोजक निखिल पवार, श्रीकृष्णा नाडे, स्वप्नील घोरपडे.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रावसाहेब सोनकांबळे, ईश्वर भातपुडे,द्वारकाताई झोटे, करूणा पवार, इंदुबाई साळवे,ॲड.धनेश गवळी यांनी केले असून या धम्मदीक्षा सोहळ्याचे संयोजक श्रीकृष्णा नाडे हे आहेत......
0 टिप्पण्या