🌟परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आ.राजेश विटेकर यांची नियुक्ती.....!


🌟प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने व पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्तें नियुक्तीपत्र प्रदान🌟

परभणी (दि.२८ जानेवारी २०२५) : परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते आज मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी आमदार विटेकर यांना हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती.  या नियुक्तीबद्द आमदार विटेकर यांचे अभिनंदन होत आहे.

           दरम्यान, पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच आपणास इथपर्यंतचा प्रवास करता आला. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासह पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्‍वास आमदार विटेकर यांनी व्यक्त करीत पक्षाचे अध्यक्ष पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे आभार व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या