🌟बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुदर्शन घुलेच...!


🌟सीआयडीच्या तपासात आली माहिती समोर ?🌟


बिड :- संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे ०९ डिसेंबर २०२४ रोजी अमानुषणे निर्घृण हत्याकांड घडविण्यात आले होते या निर्घृण हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत अमानवीय छळ करुन निघृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनीच ही निर्घृण हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता यातूनच सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या निर्घृण हत्याकांडाचा खरा मास्टरमाईंड वाल्मीक कराड हाच असल्याचा गंभीर आरोप सुरुवातीपासून होत आहे वाल्मीक कराडला अटक करावी, यासाठी राज्यभरात मोठमोठी आंदोलनं देखील झाली. अलीकडेच वाल्मीक कराडला अटक करून त्याच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत असतांना सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला आहे. सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलं आहे तर वाल्मीक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सीआयडीच्या या खुलाशानंतर वाल्मीक कराड नव्हे तर सुदर्शन घुले हाच खरा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे. दुसरीकडे, सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर आणि वाल्मीक कराडला गँगचा सदस्य असल्याचं म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. सीआयडीचे तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. पण आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या