🌟मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाडक्या बहिणींचा हप्ता २६ जानेवारीपुर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार....!


🌟उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हाप्त्याबाबत माहिती दिली🌟

मुंबई :- राज्यातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्यात सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक माता भगिनींना आधार मिळाला.या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्तन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

 या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जुलै ते डिसेंबर असे सहा हाप्ते जमा करण्यात आले आहेत. आता जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे. पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे. परवाच या योजनेसाठी ३७०० कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. २६ तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हाप्त्याबाबत माहिती दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या