🌟राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली मागणी🌟
मुंबई :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार अधिपत्याखालील कर्मचारी आनंदात आहे.
केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. मागील महाराष्ट्र सरकारने २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुक्रमे सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू केला होता. शिफारस केलेल्या मुदतीपेक्षा तीन वर्षे उशिरा हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यावेळीही राज्य सरकार २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मागणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे.....
0 टिप्पण्या