🌟नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन फ्लश आऊटचा दणका : दोन तलवारीसह देशी-विदेशी दारुसाठा जप्त...!


🌟खडकीतील शेख जिलानी शेख बाबा या आरोपीच्या घरातून दोन तलवारी,एक खंजीरसह देशी दारू जप्त🌟

नांदेड :- नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' या जोरदार मोहिमेने आता जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच जरब बसवली असून संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट नावाची मोहीम काही दिवसांपूर्वी सुरु केली आहे या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकातील प्रमुखांनी आपआपल्या हद्दीतील मटका,गुटखा,जुगार यासारख्या अवैध धंद्यांना प्रतिबंध घालावा असे निर्देश अबिनाशकुमार यांनी दिले आहेत.

याच ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत अवैध रेतीची चोरटी वाहतूक पकडून संबंधीत वाहने आणि त्या-त्या वाहनातील रेती जप्त केली जात आहे याच मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील हिमायतनगर पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी दि.२० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते ९.३० या वेळेत हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथे संशयावरुन काही ठिकाणी तपासणी केली असता या तपासणी मोहीमेत खडकी येथील रहिवाशी शेख जिलानी शेख बाबा वय ५० या आरोपीच्या घरी दोन तलवारी,एक खंजीर,देशी दारुच्या २८ बाटल्या आणि विदेशी दारुच्या १२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या जप्त वस्तुंची किंमत सुमारे साडेसहा हजार आहे. तर हिमायतनगर येथील वज्रधारी ढाबा येथुन विदेशी दारुच्या ८७ बाटल्या तसेच नगदी १२ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. दारुच्या बाटल्यांची किंमत १४ हजार रुपये आहे. ढाब्यावरील या दारु प्रकरणी वसंत अमरसिंग राठोड, रोहित वसंत राठोड आणि अक्षय लक्ष्मण राठोड या तिघांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच याच गावात तानाजी सदाशिव सोळंकी याच्या टीनपत्र्याच्या शेडमध्ये देशी दारुच्या ९३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या मालाची किंमत साडेसहा हजार रुपये इतकी आहे. खडकी बाजार येथील दोन तलवारी, एक खंजीर आणि देशी-विदेशी दारुच्या बाटल्या या सर्व मालाची किंमत ३६ हजार रुपये इतकी आहे. वरील प्रकरणी सपोउपनी चाँदराव साखरे, सपोउपनी शंकर जाधव आणि पोहवा विजय आऊलवार या तीघांच्या फिर्यादीवरुन हिमायतनगर ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अधिक्षक अबिनाशकुमार, भोकरचे अपर अधिक्षक खंडेराव धरणे, नांदेडचे अपर अधिक्षक सुरज गुरव आणि भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शफकत अमना यांच्या नेतृत्वाखाली तसेच हिमायतनगरचे पोनी अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ बंकट, हेकॉ कदम, पोकों बुलबुले, हेकॉ आडे, हेकॉ सोनपारखे, एन.पी.सी. मकसूद, डीपीसी हणवते, हेकॉ गुंडेवार, पोकों तेलंग, पोकॉ पिंगलवाड, एएसआय साखरे, एएसआय जाधव आणि हेकॉ आऊलवार यांनी ही कामगिरी केली. वरील प्रकरणी उपरोक्त पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर राजू जयस्वाल आणि गजानन जाधव या दोन आरोपींचा शोध चालू आहे. हिमायतनगर पोलीसांना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या