🌟सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल : वैद्यकीय पदव्युत्तर पदवीसाठी डोमिसाईलवर आरक्षण घटनाबाह्य🌟
नवी दिल्ली :- वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डोमिसाईलवर आरक्षण हे घटनाबाह्य आहे असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने काल बुधवार दि.२९ जानेवारी २०२५ रोजी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डोमिसाईलच्या आधारावर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाचे न्या. हृषिकेश रॉय, न्या. सुधांशू धुलिया आणि न्या. एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. खंडपीठाने सांगितले की, राज्य कोट्याच्या अंतर्गत पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी डोमिसाईल आधारित आरक्षण हे असंवैधानिक आहे. कारण हे कलम १४ अंतर्गत राज्यघटनेच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते. कारण आपण सर्वच जण भारताचे नागरिक आहोत. या ठिकाणी राज्याचे डोमिसाईल नाही. आपल्याला भारतात राहण्याचे तसेच त्यासाठी कुठेही ठिकाण निवडण्याचे आणि देशात कुठेही व्यापार, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. राज्यघटना आपल्याला संपूर्ण भारतात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाचा अधिकारही देतो, असे खंडपीठाने नमूद केले. कोणत्याही राज्यात राहणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमांमध्ये एका निश्चित पदवीपर्यंत आरक्षणाला परवानगी असू शकते. पण पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी हे स्वीकारार्ह नाही. कारण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात तज्ज्ञ डॉक्टर असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी डोमिसाईलवर आधारित आरक्षण हे राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन ठरते, असे खंडपीठाने नमूद केले......
0 टिप्पण्या