🌟भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन🌟
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी तालुक्यातील मलकापुर येथे भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मलकापूर ग्रामस्थ यांनी केले आहे.
परळी तालुक्यातील मलकापुर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कथा परिसता रामायण | पूर्वज उद्धरती | पुर्वजांचे नवल कोण | उद्धरे जाण त्रिजगती || भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन मलकापुर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. रामायण ग्रंथातील अध्याय वाचनास सकाळी ५ वा प्रारंभ होऊन, सांगता ४ वा होणार आहे. त्यानिमित्त रात्री ९ ते ११ ह.भ.प.रामायणार्य विजय महाराज वाघ बनकर हिंगोलीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मण शक्ती कार्यक्रमास रामभक्त ह.भ.प.विनायक महाराज गुट्टे गुरूजी अध्यक्ष श्री संत जनाबाई संस्थान गंगाखेड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नोट : वाचक, सुचक मंडळीनी १ वाजन्याच्या अगोदर उपस्थितीत राहावे. तरी या कार्यक्रमाचा व श्रावणाचा महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी, वाचक, सुचक श्रोत्यो मंडळींनी व पंचक्रोशीतील मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन मलकापुर गग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या