🌟मुंबईत आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणारे परभणी जिल्ह्याचे भुमिपुत्र डॉ.शरद घाटगे याचा यथोचित सन्मान....!


🌟साळापुरीचे भुमिपुत्र प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट सहयोगी अधिष्ठाता डॉ.शरद घाटगेंचा वैद्यकीय क्षेत्रातील निरंतर सेवेबद्दल सन्मान🌟

परभणी :- परभणी जिल्ह्यातील साळापुरीचे भुमिपुत्र तथा प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट सहयोगी अधिष्ठाता डॉ.शरद घाटगे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील निरंतर सेवेबद्दल व वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांच्या कर्तृत्वाचा मुंबई येथे पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

मुंबईतील सर जे जे हॉस्पिटलचा १८० वा स्थापना दिवस व ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष समारंभाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे हॉस्पिटलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.शरद घाटगे यांचा अतुलनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे,अधिष्ठाता पल्लवी सापले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.डॉ. संजय घाटगे हे सध्या रेडिओलॉजिस्ट व इंटरव्हेन्सनल न्यूरो रेडिओलॉजी (ब्रेन स्ट्रोक) या विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यगौरवा बद्दल त्यांचे अभिनंदन माजीमंत्री सुरेश वरपुडकर, प्रा. रामभाऊ घाटगे, बळीराजा साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव देशमुख,संजय घाटगे,ॲड.राजेश्वर चव्हाण,जगदीश जोगदंड,सुनील देशमुख,दिपकराव शिंदे,रमेशराव शिंदे,माधव घाटगे आदींनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या