🌟केंद्रीय अर्थसंकल्पात मराठवाड्यातील नवीन रेल्वेमार्गाना प्राधान्य देण्याची मागणी....!

 🌟मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने निवेदनाद्वारे केली मागणी🌟 

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पाकडे मराठवाडयातील जनतेचे लक्ष लागले असून  त्यात या भागातील नवीन रेलवे मार्गाना  प्राधान्य देऊन ती मंजूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आज सर्व भारतभर सर्व राज्यातील जिल्हा आणि  तालुका केंद्राना जोडून रेल्वेमार्गाने संपर्क जोडण्याचे काम होत, दुहेरीकरण, तिहेरीकरण, बायपास, पीट लाइन देखील गरज पडले तिथे निर्माण करण्यात येत आहेत. दक्षिण-मध्य आणि मध्य रेल्वे विभागात अधोरेखित असणारी मराठावाडा विभागाचा मात्र प्रांतीय भेदभावाने सतत दुर्लक्षित होत आहेत. स्वातंत्र्य लाभून ७८ वर्षांचा दीर्घ कालावधी नंतर देखील मराठवाड्यातील कोणतेही शहरांपासून पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसोबत सरळ मार्गाने रेल्वेने जोडली नाहीत. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर ला जोडणारे सरळ मार्गांचा मागणी ठेवल्यास रेल्वे अधिकारी नकारात्मक अभिप्राय व्यक्त करतात .परंतु महाराष्ट्रातील प्रमुख शहराना सरळ मार्गाने जोडण्यारा नवीन रेल्वे मार्ग जोडने सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर आहे म्हणून खालील नवीन रेल्वे मार्गांचा बजेटात मंजुरीसह प्रत्यक्ष निर्माण करण्यात यावेत.

 १. संभाजीनगर-परभणी (दुहेरीकरण)

 २. संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे.

 ३. संभाजीनगर-चाळीसगाव.             

 ४. गंगाखेड-पानगाव-लातूर.

 ५. परभणी-पाथ्री-माजलगाव-वडवणी-बीड                            किंवा परभणी-सोनपेठ-शिरसाळा-वडवणी-बीड                 

 ६. रोटेगांव-पुणतांबा

 ७. परभणी-जिंतूर-लोणार-मेहकर-चिकली-बुलडाणा.

 ८. परळी वैजनाथ-अंबाजोगाई केज-वाशी-भूम-करमाळा-जेऊर-दौंड.        

 ९. जालना-बीड-धारशिव.

१०. संभाजीनगर मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट.

११. परभणी-औंढा नागनाथ-हिंगोली-पुसद.

१२. लातूर-औसा-उमरगा-कल्बुर्गी.

१३. पूर्णा-गंगाखेड-सोनपेठ-माजलगाव-गेवराई-नेवासा-श्रीरामपूर.

१४. वासिम-कारंजा-बडनेरा (अमरावती).

१५. अष्टी-शिराळा-बिटकेवाडी- श्रीगोंदा-श्रीगोंदा रोड.

१६. नांदेड-लोहा-अहमदपुर-लातुररोड 

१७. भालकी-हुमनाबाद.

 १८. चार ही बाजूने रेल्वेमार्गाने जोडलेला एकमेव जंक्शन आणी मराठवाड्याचे मध्य भागांत स्थित परभणी स्थानकावर पीट लाइन सुविधा.

१९. नगर-मुरबाड-कल्याण.वरील नवीन मार्गांचा सोबत निर्माणाधीन या खालील रेल्वेमार्गना पूर्ण कराव्यात.

२०. संभाजीनगर-अंकाई (दुहेरीकरण)

२१. परळी-बीड-अहिल्या नगर.

२२. नांदेड-यवतमाळ-वर्धा.

२३. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर.

२४. नांदेड-बीदर.

 २५. मनमाड-धुळे-इंदोर.

२६. लातूर (बायपास)

२७. पूर्णा (बायपास)

२८. परळी वैजनाथ (बायपास)

सोबत केंद्रीय रेल्वे बजेटात, कोरोना नंतर रद्द झालेल्या गरिबांसाठी च्या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरु कराव्यात, सर्व जलद गाड्यांत स्लीपर आणी जनरल कोचेस पूर्ववत जोडण्यात यावेत, ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकाना पूर्वी प्रमाणे टिकटात ५०% सवलत द्यावेत,आणी विभागातील सर्व जलद गाड्यांची लूज टाइम रद्द करून गाड्यांचे वेग वाढवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डॉ.राजगोपाल कालानी, रूस्तम कदम, श्रीकांत गडप्पा, कदीर लाला हाश्मी, दयानंद दीक्षित,विठ्ठल काळे, माणिकराव शिंदे बलसेकर, वैभव पोतदार, हृदय पुनवतकर, अनिल देसाई इत्यादी ने केली आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या