🌟भारताने 'मेक इन इंडिया' ते 'मेड इन इंडिया' असा प्रवास करत कालचक्राची बदलली दिशा...!


🌟जागतिक निर्मिती क्षेत्रात भारताचे स्थान बळकट २०१४-२०२४ 'मेक इन इंडिया'चे दशक🌟

मुंबई : भारताने 'मेक इन इंडिया' ते 'मेड इन इंडिया' असा प्रवास करत कालचक्राची दिशा बदलली आहे. एक अशी झेप जी देशाचे धाडस आणि दृढनिश्चयाबद्दल बरेच काही सांगून जाते. आता "मेक इन इंडिया २.०" टप्यात २७ क्षेत्रांचा समावेश करून हा उपक्रम महत्त्वपूर्ण यश आणि नव्या उत्साहाने पुढे जात आहे आणि जागतिक निर्मिती क्षेत्रामध्ये एक प्रमुख सहभागी म्हणून भारताचे स्थान बळकट करत आहे. सन २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारताला जागतिक निर्मिती केंद्रात रूपांतरित करण्याच्या धाडसी दृष्टीसह मेक इन इंडिया उपक्रम सुरू केला. निर्मिती क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे, रोजगार निर्मिती वाढवणे आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते.

💫मेक इन इंडियाने ४५.१४ अब्ज अमेरिकी डॉलर्स परकीय थेट गुंतवणुकीसह (एफडीआय) सुरुवात  :-

मेक इन इंडियाने ४५.१४ अब्ज अमेरिकी डॉलर्स परकीय थेट गुंतवणुकीसह (एफडीआय) सुरुवात करत २०२१-२२ मध्ये ८४.८३ अब्ज अमेरिकी डॉलर्स अशी मोठी परकीय थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०२४ दरम्यान, भारताने ६६७.४१ अब्ज एफडीआय आकर्षित केली असून गेल्या २४ वर्षांत मिळालेल्या एकूण एफडीआयपैकी ती जवळपास ६७% आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या