🍻दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्याची इच्छा असणार्या व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांना उपस्थित राहाण्याचे आवाहन🍻
परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये उद्या शनिवार दि.११ जानेवारी रोजी मद्यमुक्तीसाठी मोफत जनजागरण सभा सभेचे आयोजन करण्यात आले असून दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्याची इच्छा असणार्या व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांना उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दारुच्या व्यसनापासून मुक्त होण्याची इच्छा असणार्या व्यक्तींच्या मद्यमुक्तीसाठी शनिवारी दि.११ जानेवारी रोजी सेलू शहरात मोफत जनजागरण सभा आयोजित करण्यात आली आहे. अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) या जागतिक स्तरावरील संस्थेद्वारे सेलू् शहरातील सप्तपदी मंगल कार्यालय अँड लॉन्स, मिनाक्षी टॉकीज समोर, पारिजात कॉलनी, वृंदावन नगर येथे उद्या शनिवारी दुपारी ०४.०० वाजता मोफत जनजागरण सभा आहे. या सभेस दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांनी, हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी मोफत पुस्तिका वितरीत करण्यात येणार असून माहितीही दिली जाणार आहे. जनजागरण सभेबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 9423142991, 9730382878, 9421461727, 7499077047 आदींशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.........
0 टिप्पण्या