🌟परभणीत‘लायन्स क्लब’ तर्फे दि.०३ फेबु्रवारी रोजी मोफत जयपूर फुट शिबीराचे आयोजन....!


🌟अशी माहिती लायन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष ला.अरुण (अवि) टाक यांनी दिली🌟


परभणी (दि.०९ जानेवारी २०२४) : परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय व लायन्स क्लब पुणे सुप्रिम व लायन्स क्लब परभणी मेन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०३ फेबु्रवारी २०२५ रोजी परभणीत दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम पायरोपण (जयपुर फुट) पोलिओ कॅलिपर्स शिबीर आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लायन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष ला.अरुण (अवि) टाक यांनी दिली. 

             परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या शिबीरात ०३ फेबु्रवारी रोजी मोजमाप घेण्यात येणार असून दि.०४ व ०५ फेबु्रवारी २०२५ रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. शिबीरात १०० जणांची नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी गरजू नागरीकांनी ला.अरुण टाक (9545222255),ला.रामेश्‍वर मणियार (8698951888),ला. सुशिल मुंदडा (8689820444) व ला. डॉ. अस्मिता सुराणा (9822037205) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

             दरम्यान, आधूनिक जयपूर फूट हा कृत्रिम पाय लावल्यानंतर कुठलाही आधार न घेता रुग्ण चालू, धावू शकतो, सायकल चालवू शकतो. अपघात, मधूमेह, रक्तवाहिन्यांचे आजार, गँगरीन आदी कारणांमुळे हात-पाय काढलेल्या रुग्णांना या अद्यावत व आधूनिक प्रक्रियेने तयार होणार्‍या जयपूर फुटमुळे नवीन जीवन मिळू शकेल. त्यामुळे गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लबच्यावतीने करण्यात आले आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या