🌟तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण : वन विभाग लक्ष देईल काय ?🌟
पुर्णा (दि.३० जानेवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव-कौडगाव शिवारात दि.२८ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०९.३० वाजेच्या सुमारास एका वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर समोर नरभक्षक हिस्र प्राणी म्हणून ओळखला जाणारा बिबट्या शिकारीच्या उद्देशाने भर रस्त्यात बसल्याची घटना घडली होती यावेळी टिप्परच्या हेडलाईट मुळे डोळे दिपल्याने बिबट्याला हालचाल करता आली नाही यावेळी टिप्पर मधील कामगारांनी त्यांचे आपल्या मोबाईलने चित्रीकरण केल्याने या परिसरात खरोखरच बिबट्याचे आगमन झाले या गोष्टीला पुष्टी मिळाली याच दिवशी गणपूर-ममदापूर शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी शेजारील एका शेत आखाड्यावरील एका गाईच्या छोट्या वासराची देखील मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात हिंस्र पशुने शिकार केल्याचे सकाळच्या सुमारास निदर्शनास आले सदरील गाईच्या वासराची बिबट्यानेच शिकार केली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केले होते सदरील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आज शुक्रवार दि.३० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील पुनर्वसीत निळा गावालगतच्या कानडखेड शिवारातील गट क्रमांक ३५९ ते गट क्रमांक ३६३ या परिसरातील शेतकरी साहेबराव नारायणराव सुर्यवंशी यांच्या आखाड्यावरील शेळीसह करडूवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून जिवे मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला सदरील शेळी व करडूची देखील बिबट्यानेच शिकार केल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव नारायणराव सुर्यवंशी यांच्या आखाड्यावर त्यांचा मुलगा गुलाब साहेबराव सुर्यवंशी हा आखाडा सांभाळण्यासाठी असतो गुलाब सुर्यवंशी यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली असता त्याचे देखील म्हणणें आहे की शेळी व करडुवर बिबट्यानेच हल्ला केला आहे या घटनेवरून असे निदर्शनास येते की पुर्णा-गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये सर्वत्र बिबट्याचा मुक्तसंचार होत असून शेतकऱ्यांच्या शेत आखाड्यांवरील पाळीव प्राण्यांना बिबट्या लक्ष बनवत आहे त्यामुळे परिसरातील गावांतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.......
0 टिप्पण्या