🌟छत्रपती संभाजी सेना कार्यालयात त्यांचा छत्रपती संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आला भव्य सत्कार🌟
परभणी :- आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे आज सोमवार दि.२७ जानेवारी रोजी परभणी दौऱ्यावर आले असता येथील छत्रपती संभाजी सेना कार्यालयात त्यांचा छत्रपती संभाजी सेनेच्या वतीने मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे व संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे,उद्योजक अरुण मराठे,विश्व हिंदू परिषद जिल्हा संयोजक ॲड.राजकुमार भामरे,संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर,युवा सेना शहर प्रमुख बाळराजे तळेकर, छत्रपती संभाजी सेना शहराध्यक्ष अरुण पवार,उमेश शिंदे,पवन कुरिल आदी मान्यवरांची उपस्थीती होती.......
0 टिप्पण्या