🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟केंद्र सरकारची 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी,केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती🌟

✍️ मोहन चौकेकर

💫बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरात चोराकडून चाकू हल्ला, चाकूचं धारदार पातं पाठीत खुपसलं, लीलावती रुग्णालयात डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया ; तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं ; याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया ; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, नाना पटोलेंसह खासदार वर्षा गायकवाड यांची टीका 

💫सैफ अली खान प्रकरणात पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली; घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ; तैमुरला सांभाळणाऱ्या लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; आरोपीवर ट्रेस पासिंग, चोरीसह जिवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांची माहिती  ; मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच ; सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर 

 💫केंद्र सरकारची 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती 

💫राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे परळीतच ; वाल्मिक कराड फसल्याने धनंजय मुंडेची पुरती कोंडी  ; वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव असल्याची चर्चा,  धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला ;  वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचा जनता दरबार

 💫'बीडचा विकास बारामतीसारखा करणार, बारामतीतील विकासकामांच्या उद्घाटनावेळी मंत्री पंकजा मुंडेंकडून कौतुकाचा वर्षाव  

💫पुणे शहर पोलिस दलातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; अमितेश कुमारांचे आदेश, त्वरित पदभार स्वीकारण्याचे निर्देश  

💫महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार 

💫लिलावाच्या भीतीने वाल्मिक कराड कुटुंबियांची धावपळ! पिंपरीतील फ्लॅटचा चार वर्षांचा थकीत कर काही तासांतच भरला ; विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट   ; अज्ञातांनी घरात घुसून बीडच्या तरुणाच्या गळ्यावरून चाकू फिरवला, रक्ताच्या थारोळ्यातच सोडला प्राण, संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार 

💫भरधाव कंटेनरने 15 गाड्यांना दिली धडक ! पोलिसांची गाडी देखील सुटली नाही, पुण्यातील विचित्र अपघातात अनेक जखमी  ;  पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या