🌟विधानसभा निवडणुकीत आरएसएसने केलेल्या प्रचाराचे शरद पवारांनी कौतुक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना(शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या संयुक्त पक्षांच्या महायुतीने मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचं कौतुक केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचे शरद पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव तर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं. दरम्यान, गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचं कौतुक केले आहे......
0 टिप्पण्या